बाजार समितीचा प्रभावक्षेत्र
- By -
- Apr 03,2025
लासलगांव बाजारपेठ मध्यवर्ती स्थानाची भुमिका बजावत आहे. मध्यवर्तीस्थानाच्या भुमिकेत कृषि उत्पन्न बाजार समितीने स्वतःचे मुख्य व दुय्यम प्रभावक्षेत्र निर्माण केलेले आहे. मुख्य प्रभावक्षेत्रात सभोवतालच्या 114 गावांचा समावेश असुन, दुय्यम प्रभावक्षेत्रात धुळे, जळगांव, औरंगाबाद, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुख्य प्रभावक्षेत्रात निफाड तालुक्यातील 59 गांवे, चांदवड तालुक्यातील 28 गांवे व येवला तालुक्यातील 27 गावांचा समावेश होतो. निफाड तालुक्यातील 473.49 चौ. कि. मी., चांदवड तालुक्यातील 209.13 चौ. कि. मी. व येवला तालुक्यातील 222.21 चौ. कि. मी. असे एकूण 904.93 चौ. कि. मी. क्षेत्र प्रभावक्षेत्राखाली आहे. तिन्ही तालुक्यातील 1,60,183 लोकसंख्या प्रभावक्षेत्राखाली आहे.
बाजार क्षेत्र :-
दि. 01/04/1947 ते 31/03/1982 पर्यन्त लासलगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे नाशिक जिल्ह्यातील निफाड व चांदवड ह्या दोन तालुक्यांचे होते. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-1 दि. 25/03/1982 रोजी झालेल्या राजपत्रानुसार दि. 01/04/1982 पासुन लासलगांव बाजार समितीचे विभाजन होऊन निफाड तालुक्यासाठी 'कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव' व चांदवड तालुक्यासाठी 'कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड' अशा दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या व दि. 01/04/1982 पासुन लासलगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे संपुर्ण निफाड तालुक्याचे झाले.
त्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्र पान नं. 1310 ते 1313, दि. 28 डिसेंबर, 1995 प्रमाणे लासलगांव बाजार समितीचे विभाजन होऊन निफाड तालुक्यात 'कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव' व 'कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत' अशा दोन स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या. निफाड तालुक्यातील 136 गावांपैकी पुर्व भागातील लासलगांव, टाकळी (विंचुर), पाचोरे बुद्रुक, पाचोरे खुर्द, भरवस, मरळगोई बुद्रुक, मरळगोई खुर्द, मानोरी खुर्द, रूई, वेळापूर, वाहेगांव, वाकद, वनसगांव, रामपुर (आंबेवाडी),उगांव, बोकडदरे, ब्राम्हणगांव (वनस.), ब्राम्हणगांव (विंचुर), रसलपूर, हनुमाननगर (गुंजाळवाडी), डोंगरगांव, पिंपळगांव नजिक, पिंपळस (रामाचे), विष्णूनगर (पाबळवाडी), विठ्ठलवाडी,विंचुर, शिवरे, शिवडी, शिवापुर, शिरवाडे वाकद, दिंडोरी, कुंदेवाडी, कोटमगांव, कोठुरे, श्रीरामनगर (कोळवाडी), कोळगांव, काथरगांव, कानळद, कुरूडगांव, निफाड, निमगांव वाकडा, खेडलेझुंगे, खेडे, खडक माळेगांव,खानगांव नजिक, थेटाळे, गोळेगांव, गोंदेगांव, गाजरवाडी, देवगांव, महादेवनगर, दहेगांव, सारोळे खुर्द, सारोळे थडी, सोनेवाडी बुद्रुक, सोनेवाडी खुर्द, सुभाषनगर (ठोकळवाडी), सुंदरपूर, जळगांव, धारणगांव वीर, धारणगांव खडक, धानोरे, नांदुरमध्यमेश्वर, नांदगांव,नैताळे अशी 65 गांवे लासलगांव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येतात.