बाजार समितीचे आवारे
- By -
- Apr 04,2025
बाजार आवारे :-
प. पु. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवार, लासलगांव (जुनी जागा) :-
![]() | बाजार समितीचे लासलगांव येथे दोन बाजार आवारे असुन प. पु. भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवाराचे क्षेत्र 09 हेक्टर 84 आर आहे. येथे भुसार, तेलबिया, टोमॅटो, डाळींब व भाजीपाला ह्या शेतीमालाचे लिलाव चालतात. |
श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार, लासलगांव (नविन जागा) :-
तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवाराचे क्षेत्र 06 हेक्टर 78 आर आहे. येथे फक्त कांदा ह्या शेतीमालाचे लिलाव चालतात. | ![]() |
उपबाजार आवार, निफाड (जुनी जागा) :-
![]() | बाजार समितीचे निफाड येथेही दोन बाजार आवारे असुन जुन्या बाजार आवाराचे क्षेत्र 02 हेक्टर 85 आर आहे. येथे भुसार, तेलबिया, व टोमॅटो ह्या शेतीमालाचे लिलाव चालतात. |
उपबाजार आवार, निफाड (नविन जागा) :-
![]() | ![]() |
उपबाजार आवार, विंचुर :-
बाजार समितीने विंचुर येथेही 02 हेक्टर 40 आर जागेत दि. 03 डिसेंबर, 2004 पासुन उपबाजार आवार सुरू केले असुन त्याठिकाणी भुसार, तेलबिया, द्राक्षेमणी व टोमॅटो या शेतीमालाचे लिलाव चालतात. | ![]() |
तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र, उगांव :-
![]() | बाजार समितीने परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतक-यांच्या सोईसाठी दि. 26 जानेवारी, 2004 पासून द्राक्षे हंगामात मौजे उगांव येथे द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू केलेले आहेत. सदरचे लिलाव सध्या भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत चालतात. |
तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र, नैताळे :-
तसेच मौजे नैताळे येथेही द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी दि. 28 मार्च, 2005 पासुन तात्पुरते खरेदी-विक्री केंद्र सुरू केलेले असुन सदरचे केंद्र सुध्दा भाडेतत्वावर घेतलेल्या जागेतच चालु आहे. | ![]() |
तात्पुरते खरेदी-विक्री केद्र, खानगांव नजिक :-
![]() | त्याचप्रमाणे मौजे खानगांव नजिक येथेही बाजार समितीने दि. 02 फेब्रुवारी, 2009 पासुन द्राक्षेमणी व टोमॅटो ह्या शेतीमालाचे लिलाव सुरू केले असुन सदरचे लिलाव खडक माळेगांव ग्रुप ग्रामपंचायतीकडुन भाडेतत्वावर घेतलेल्या जागेत चालु आहे. |